भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आज महाराष्ट्र शासनाच्या अन्याय जनक वर्तणुकीमुळे काळ्या फित लावून काम केले .71 दिवसाच्या परीक्षांच्या बहिष्कार कालावधीतील अर्धवट वेतनाची वाटणी 18 जुलै 2018 यूजीसी रेगुलेशन ची अर्धवट अंमलबजावणी प्राध्यापकांचे प्रमोशनचे प्रश्न पेन्शनचे प्रश्न यासारख्या मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे विविध टप्पे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ, एन .मुक्टो .केंद्रीय कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारणी च्या आदेशानुसार संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे राबविण्यात येत असून याचाच आजचा सहाव्या टप्प्यात काळ्या फित लावून काम केले .यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रा. डॉ. ए. डी .गोस्वामी, प्रा. डॉ.पी. ए .अहिरे, प्रा. डॉ. एस. पी .झनके ,प्रा. डॉ. जे. एफ .पाटिल डॉ. ममताबेन पाटील डॉ. किरण वारके प्रा डॉ. अनिल हिवाळे उपप्राचार्य डॉ. एस .व्ही. पाटील, डॉ. निळकंठ भंगाळे आदी मान्यवर तसेच सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व प्राध्यापकांनी शासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला.



