शिवसेनेतर्फे पालिका निवडणूकीच्या इच्छूकांना मुलाखत अर्ज वितरण सुरू…. शहरप्रमुखांकडे जबाबदारी..

भुसावळ – राज्य निवडणूक आयोगाने भुसावळ नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धिरज पाटील, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, सुभाष चौधरी, शहरप्रमुख निलेश महाजन, बबलू बऱ्हाटे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
इच्छूक उमेदवारांचे मुलाखतीसाठी परिचय पत्रक भरून घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी याप्रसंगी केले.
भुसावळ उत्तर विभाग शहरप्रमुख निलेश महाजन आणि दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्याकडे मुलाखत अर्ज उपलब्ध आहेत इच्छूकांनी शहरप्रमुखांशी संपर्क साधावा अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.