भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ मंडळ द्वारा आंतर्राष्ट्रीय योग दिवस रेल्वे स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आभासी आणि प्रत्यक्ष रूपाने आधूनिक तंत्र ज्ञानाच्या साह्याने राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात भुसावळ विभागाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. भुसावळ मंडळ येथील योग दिवसाचे प्रक्षेपण राष्ट्र स्थरावर झाले. राष्ट्रीय स्थरावरील योग दिवसाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग हे आजचे वैशिष्ट होते. देशातील विविध प्रदेशातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. प्रोजेक्टर च्या माध्यमातून ह्या कार्यक्रमात प्रथम कोणार्क सूर्य मंदीर परिसरातून अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांनी दीपप्रज्वलन केले गेले आणि योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच तेथील खासदार आणि आमदारांचे संबोधन झाले. त्या नंतर कर्नाटक येथील म्हैसूर येथून प्रधान मंत्री मा नरेंद्र मोदी जी यांनी राष्ट्राला योग दिवसाचा चा संदेश आणि शुभेच्छा दिल्या. हा सर्व कार्यक्रम प्रोजेक्टर च्या माध्यमातून रेल्वे स्कूल च्या परिसरात प्रक्षेपित करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष रूपाने योगाभ्यास करण्यात आला. त्यात विविध योग आसने सामुहिक रीत्या करण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक योग गुरू वसंत बळेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. उपस्थित सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर पुन्हा राष्ट्रीय थेट प्रत्यक्ष सहभाग घेवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. भुसावळ रेल्वे विभागात अशा पद्धतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला गेला ही मध्य रेल्वे आणि भुसावळकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
या कार्यक्रमासाठी एस एस केडिया डी आर एम, नवीन पाटील ए डी आर एम, एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ आणि 75 पेक्षा जास्त रेल्वे अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्मिक विभाग, सिग्नल एवं दूरसंचार विभाग, विद्युत विभाग, इंजिनियरिंग विभाग, यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



