प्रकल्पातून प्रदुषण मुक्तसाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर – प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे भुसावळ महानिर्मिती प्रकल्प येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा :


भुसावळ – जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून महानिर्मितीच्या १x६६० मे.वॅट भुसावळ प्रकल्प येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला . पर्यावरण संवर्धन व पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी हे पर्यावरण दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू होता. पर्यावरणाची हानी टाळली तर त्याचा फायदा मानव जातीलाच होईल तसेच पर्यावरण रक्षणासाठी भुसावळ प्रकल्प कटीबद्ध आहे व भुसावळ १x६६० मे.वॅट प्रकल्पाची उभारणी करीत असतांना या प्रकल्पातून प्रदुषण होणार नाही यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे व कोणत्याही प्रकारचे प्रदुषण प्रकल्पातून होणार नाही अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी दिली. या प्रसंगी ” आपला परिसर आणि परिसरातील पर्यावरण यांच्याशी निष्ठा राखण्याची ” प्रतिज्ञा प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी भुसावळ प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली . भुसावळ प्रकल्प ( १x६६० मे.वॅट ) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय अत्तरदे , पर्यावरण विभाग प्रमुख कवियत्री बहिणाबाई चौधरी , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आदी मान्यवर उपस्थित होते. संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण धोरण व पर्यावरण दिवस कशाकरीता साजरा केला जातो तसेच या वर्षीचे पर्यावरणाचे घोषवाक्य ” पृथ्वी एकच आहे ” यावद्दल अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी दिली. प्रत्येक घरी घनकच -याची विल्हेवाट व उर्जा बचतीचे धडे हे प्रत्येकाच्या संस्कारात रूजविले पाहिजे असे मत उप – मुख्य अभियंता मनोहर तायडे ( स्थापत्य ) यांनी मांडले . तसेच नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त. वापर करून जीवन शैलीत बदल करण्याची गरज वेगवेगळ्या उदाहरणासहित अधिक्षक अभियंता मनिष बेडेकर ( प्रकल्प ) यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्दुत केंद्रात प्रदुषण नियंत्रणाकरीता उपलब्ध संयंत्राची माहिती कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ डॉ . राजेश चिव्हाणे यांनी दिली. यावेळी प्रकल्प उपमुख्य अभियंता महेश महाजन, नंदकिशोर पांडे , उप – महाव्यवस्थापक ( मा.सं. ) , किशोर शिरभय्ये , अधिक्षक अभियंता ( चाचणी ) , योगेश इंगळे , अधिक्षक अभियंता ( स्थापत्य ) तसेच भुसावळ प्रकल्प येथील स्थापत्य व प्रकल्पाचे कार्यकारी अभियंते, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हार्दिक सोनी यांनी केले.