भुसावळ – हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील गरीब शिवसैनिकांना “एक हात मदतीचा उपक्रम”शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोटू शोभराज चौक भुसावल रविवार, दिनांक ५ जून २०२२ रोज़ी संध्याकाळी ठीक ५ वाजता संपन्न होणार आहे.
सदर उपक्रम उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश राणे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाड़े यांच्या नेतृत्वात व
विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख मनोहर बारसे(पप्पू ) , उत्तर विभाग शहरप्रमुख निलेश महाजन, दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बऱ्हाटे, भूरा चव्हाण,प्रतिभा दुसाने, युवासेना जिल्हा युवाअधिकारी चंद्रकांत शर्मा,शिक्षक सेना जिल्हाप्रमुख विनोद गायकवाड़, युवासेना तालुकायुवा अधिकारी हेमंत बऱ्हाटे, युवासेना शहर युवाअधिकारी सूरज पाटील, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख नितीन देशमुख, तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, शहरप्रमुख मनोज पवार, अल्पसंख्यांक आघाडी शहरप्रमुख मेहमूब शेख व एस टी कामगार सेना पदाधिकारी, दिव्यांग सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे.
तरी भुसावळ शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक आयोजक उमाकांत शर्मा (नमा) यांनी केले आहे .



