आता दिव्यांगजन यांना संबंधीत रेल्वे स्थानकावर ओळखपत्र मिळणार :


भुसावळ – विभागिय रेल्वे प्रबंधक, भुसावळ कार्यालय यांच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे कि दिव्यांगजन रेल्वे
ओळखपत्र जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आतापर्यंत नाशिक, मनमाड जंळगांव, अकोला, अमरावती, पुलगाव, यवतमाळ , खंडवा , बुरहानपुर ,मलकापूर, लासलगांव, नांदगांव, पाचोरा. नांदुरा, खामगांव,
मुर्तिजापुर, शेगांव तसेच नेपानगर आरक्षण/तिकिट बुकिंग कार्यालयात स्विकारण्यात येत आहेत.
ही सुविधा आणखी चाळीसगांव, बडनेरा तसेच अचलपुर रेल्वे-बुकिंग कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येत
आहे. तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा. या संदर्भात सूचित करण्यात येते कि वरिल आरक्षण/बुकिंग
कार्यालयांत दिव्यांगजन रेल्वे ओळखपत्र जारी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रासह अर्ज स्विकारले
जातील आणि विभागिय रेल्वे प्रबंधक कार्यालय, भुसावळ येथून ओळखपत्र तयार झाल्यानंतर याच
कार्यालयात वितरित केले जातील, यामुळे केवळ ओळखपत्र तयार करण्याकरिता भुसावळ येथे जाण्याची
आवश्यकता नाही असे रेल्वे विभागीय कार्यालय यांनी कळविले आहे .