भुसावळ – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण महिला व बालविकास, इतर मागास, बहुजन कल्याण विभाग कामगार राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे आज जळगाव जिल्हा दौरावर असतांना, भुसावळ येथे श्री साईंमंदिर येथे भेट दिली .
दरम्यान ना .बच्चू कडू यांचे शहरात विविध ठिकाणी महिलांनीं उत्स्फूर्तपणे स्वागत करून त्यांचे कार्यास शुभेच्छा दिल्या .
दरम्यान भुसावळ महिला समुपदेशक केंद्र संघालिका भारती म्हस्के ,
सुप्रभाआनंद संस्थेच्या संचालिका तथा महिला दक्षता समिती सदस्य निरंजना तायड़े ,
अँड प्रिया अडकमोल
सविता माळी ( महिला दक्षता वरणगव) यांनीं सुद्धा मंत्रमहोदयांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . यावेळी मोठ्या संख्यने महिला भगिनी उपस्थित होत्या



