जातीय, धार्मिक सलोख्याला पाठिंबा देण्यासाठी भुसावळात स्वाक्षरी संदेश मोहीम :

भुसावळ - दिनांक 7 मे 2022 रोजी  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये जातीय,धार्मिक सलोखा कायम राहावा, जिल्ह्यातील,राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिक पोलीस दला सोबत आहे हा संदेश देण्याच्या उद्देशाने जातीय धार्मिक सलोखा जपण्यासाठी आपली सही संदेश( SIGNATURE CAMPAIGN FOR COMMUNAL HARMNOY) ही मोहीम राबविण्यात येत आहे.

   या मोहिमेत भुसावळ उपविभागातील सर्व जबाबदार नागरिक,विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला यांनी सहभाग घेऊन जातीय / धार्मिक सलोखा याबद्दल जनजागृती करून जातीय सलोखा संदर्भात सही / संदेश लिहायचे आहेत.

  पोलीस दलाच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सामील होण्यासाठी आपल्याला फक्त पोलीस दलाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला बॅनर वर सही करून संदेश द्यायचा आहे.

भुसावळ शहरात यासाठी खालील ठिकाणी बॅनर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत -

बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर
रजा टॉवर
अष्टभुजा चौक / नाहाटा चौफुली
भुसावळ रेल्वे स्टेशन पोलीस चौकी जवळ
यावल नाका महात्मा गांधी पुतळ्याजवळ

दिनांक – 7/5/2022, शनिवार

वेळ – सकाळी 9.00 ते रात्री 8.00 पर्यंत
मोहिमेत सहभागी जास्तीत जास्त नागरिकांनी व्हावे असे आवाहन सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ यांनी केले आहे…