भुसावळ शहरात तृतीयपंथीना शिधापत्रिका वाटप !

भुसावळ – शहरातील तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा योजने मधील अंतोदय योजने अंतर्गत तृतीयपंथीना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,जळगांव जिल्ह्यातील कदाचित पहिला कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ रोजी भुसावळ तहसील कार्यालयात तहसीलदार दिपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संपन्न झाला.भुसावळ शहरातील १८ तृतीयपंथी खुशी सिंह,मोना सिंह,काजल कवर गुरु सारिका,आसमा गुरू सोनु,तारा गुरू सोनु,सारिका राजू साबळे,रोशनी सिंह मुन्नी सिंह,मीरा सिंह,पुजा सिहं, रुपाली कुवर,ज्योती जान गुरू तमन्ना जान, कांची गुरु सारिका,खुशी कुवर,दया कुवर उर्वशी जान,लवली सिंह, पायल गुरू सोनू अशांना अन्न व नागरी पुरवठा योजने मधील अंतोदय योजने अंतर्गत शिधापत्रिका वाटप करण्यात आली.एका लाभार्थ्याला ३५ किलो दर महिन्याला स्वस्त धान्य देण्यात येणार आहे.

याप्रसंगी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे,पुरवठा निरीक्षक अधिकारी ए.जे.इंगळे,पुरवठा निरीक्षक अतुल नगर गोजे,महसूल सहाय्यक रुपाली गुरव,घुले मॅडम, शिरसाठ नाना,अशांच्या उपस्थित तृतीयपंथी यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या