अजिंठा- अजिंठा घाट चढून वर आलेल्या परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर औरंगाबाद एसटीने अचानक पेट घेतला. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखत सुमारे ४० ते ४५ प्रवासी बसच्या खाली उतरल्याने सुदैवाने सुखरूप आहेत.

बॅटरी बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज मुक्ताईनगर डेपोची एसटी मुक्ताईनगर औरंगाबाद एमएच १४ बीटी १६५२) ४० ते ४५ प्रवासी घेऊन रविवारी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास अजिंठा घाट चढून वर आली असता वळणाजवळ चालकाच्या केविनने अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवासी बसच्या खाली तत्काळ उतरल्याने सुखरूप बचावले असून पुढील अनर्थ टळला. एसटीच्या बॅटरी बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी आणली टँकरच्या साह्याने आग आटोक्यात…
घटनेची माहिती मिळताच समी चाऊस, फकिरा पठाण, सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुतें, बीट जमादार अक्रम पठाण, ग्रामस्थ संजय ब्राह्मणदे यांच्यासह व माहोर, सुजित गुप्ता आदींनी टँकरने आग आटोक्यात आणली


