भुसावळ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज पंडित, पुरोहित यांच्याबाबत उपहासात्मक वक्तव्य करून सर्व ब्राम्हण सामाजाच्या भावना दुखावल्याने संतप्त समाजाने मिटकरी यांचा तिव्र निषेध केला असून याबद्दल समस्त ब्राह्मण समाज भुसावळच्यावतीने त्यांनी ब्राह्मण समाज पंडित, पुरोहित यांची माफ़ी मागावी तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी राजीनामा द्यावा अथवा पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे . याबाबत शुक्रवार दिनांक २२ रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे .
लोक प्रतिनिधि असून देखील असे निंदनीय वक्तव्य मिटकरी नेहमी ब्राह्मण समाज बद्दल बोलतात
समस्त समाज बांधव यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांचेकडे मागणी केली की आपल्या पक्षाची बदनामी टाळायचीअसेल तर त्यांची या पक्षातुन हक्काल पट्टी करा आणि यांच्या राजीनामा घ्यावा. तसेच प्रशासनाने सुद्धा कारवाई कारवाई लवकरात लवकर योग्य ती कारवाई न झाल्यास ब्राह्मण समाज तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.तसेच याबाबत न्यायालयात सुद्धा दाद मागु असे ही निवेदना असेही निवेदनात नमूद आहे . आमदार अमोल मिटकरी यांच्या वर कार्यवाही झालीच पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी असे करणार नाही.
निवेदन देते समयी उमाकांत शर्मा (नमा),जयप्रकाश शुक्ला, दीपक पार्थरकार, देवेश कुलकर्णी, अँड. अभिजीत मेने, सागर पतकी, शांतनु गजके, भूषण जोशी, योगेश तिवारी, गोपाळ पुरोहित यांचेसह समस्त ब्राह्मण समाज भुसावळ येथील समाज बांधव उपस्थित होते .



