भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे दिनांक 20/04/2022 रोजी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उमंग 2022 कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. ए .डी. गोस्वामी,उदघाटक म्हणून श्री रागिब अहमद , उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एन.ई. भंगाळे ,उमंग कार्यक्रम समन्वयक डॉ. रश्मी शर्मा उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य प्रमुख व उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांनी केले तर श्री. रागिब अहमद यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त आयोजित करण्यात येणाऱ्या अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांना चालना देण्याविषयी प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सपना कोल्हे यांनी केले. श्री रागिब अहमद यांनी पहिल्या सत्रामध्ये आपल्या मार्गदर्शनात करिअर संबंधित उद्दिष्टे कशी निश्चित करावी, उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे अशी माहिती दिली त्यानंतर 11 ते 12 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ट्रेझर हंट या स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या सत्रामध्ये श्री. अनिकेत चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्व संवादातून आत्मविश्वास कसा वाढवावा याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. त्यानंतर 2 ते 3 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर 3 ते 4 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येसुद्धा 80 विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला
समारोपाच्या कार्यक्रमात प्रथम .द्वितीय .तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ एस व्ही पाटील ,उपप्राचार्य प्रा.डॉ.बी. एच. बऱ्हाटे उपप्राचार्य प्रा.डॉ . ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ एन.ई. भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडायला डॉ. पि .के .पाटील, प्रा.के .पी पाटील, प्रा. डॉ.ममताबेन पाटील, प्रा.डॉ. रश्मी शर्मा, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. भूषण चौधरी, प्रा. खिलेश पाटील, प्रा. स्वाती शेळके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा. सपना कोल्हे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. हेमंत सावकारे प्रा. सुरज धांडे, प्रा.सोनिया टेकवानी ,प्रा. आकाश तायडे यांनी परिश्रम घेतले.



