फॅक्टरीतील तीष्य उबाळे या बालिकेने स्केटींग मध्ये केला जागतिक विक्रम :


भुसावळ – तालुक्यातील वरणगांव फॅक्टरीतील रहिवाशी तिष्य देवानंद उबाळे या १३ वर्षीय बालीकेने स्केटिंग मध्ये एक तासात सलग . दहा इव्हेंट स्केटींग मध्ये करून जागतिक विक्रम केला आहे . या स्पर्धेत भारतभरातून ७५९ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता . जागतीक स्तरावर हा पहीलाच विक्रम आहे
ऑल वर्ल्ड मल्टीपल इव्हेन्ट आर्गनायझेशन ने स्केटींग स्पर्धा ऑन लाईन पद्धतीने भरविण्यात आल्या होत्या . या स्पर्धेत तिष्य ने हे यश संपादन केले आहे . तिला या यशासाठी जागृती काळे यांचे मार्गदर्शन लाभले . तिला शील्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे .
तिष्य हिने आता पर्यत औरंगाबाद, गोवा, नागपूर, मुंबई, जळगाव , भुसावळ या ठिकाणी स्केटींग च्या वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन मैडल मिळवली आहेत . शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय, राज्य ते नैशनल लेव्हल पर्यंत फक्त आठ महीने वरणगांव फॅक्टरी , जळगांव येथे सराव तीने आपला प्रभावी खेळ दाखवीला आहे. आता ती मे महीन्यात थायलैंड ला होणाऱ्या आर्सेक एशिया स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘
या जागतिक किर्ती च्या यशा बद्दल तिष्य चे परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे .