भुसावळ – इ. स. 14000 वर्षापूर्वी स्थापन झालेले 600 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान मंदिरात दि. 16 एप्रिल 2022 शनिवार रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
हनुमान जन्मोत्सवा निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या कोरानाच्या कठिण काळानंतर आता भक्तांनमध्ये प्रचंड उत्साहो वातावरण आहे. यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचे आकर्षण म्हणजे भारतात अतिशय दुर्मीळ होणारी हनुमंताची सहस्त्रनाम पुजा व सहस्त्रधारा महाअभिषेक होय. या पूजेचे वैशिष्टये म्हणजे या पुजेत 9 जण बसतात हनुमंताच्या 1000 नावाने विविध वस्तूंची यथाशक्ती आहुती दिली जाते. व 1000 धारांनी हनुमंताच्या महाअभिषेक होतो. पहाटे 3.30 वाजेपासून हनुमंताला दुध, दही, सहद, तुप, साखर, अत्तर, दशमूळ, उसाचा रस, गंगाजल, आदींनी मोटू वर्मा, नितीन शर्मा, संकेत अग्रवाल, गोविंदा शर्मा, राजेश अग्रवाल, गोविंद अग्रवाल, महेंद्र चौधरी, योगेश अग्रवाल, मयूर अग्रवाल यांच्या हस्ते श्री बडा हनुमान मंदिराचे मुख्य प्रशांत रामदासजी वैष्णव व जयप्रकाश शुक्ला पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाल महाअभिषेक संपन्न होणार आहे. सकाळी सुर्यदयाच्या वेळेस हनुमानाच्या जन्मसोहळा महाआरती होईल. नंतर दिवसभर पंजेरीच्य च्या विशीष्ट प्रसादाचे वाटप होणार आहे. सकाळी महाआरती नंतर हनुमंताला छप्पन भोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांकडून सव्वाकिलो प्रसाद या प्रमाणे 56 भाविकांकडून विविध प्रकारच्या मिठाई, र्ेंळे, सुकामेवा, नमकीन आदींचा भोग हनुमंताला लावण्यात येणार आहे.
उत्साहाचा एक भाग म्हणून सायं 6 वा. हनुमान जन्मोत्सवाची नगर भ्रमण भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शहरातील तसेच परिसरातील हनुमान भक्तांनी हजारोंच्या संख्येने या मिरवणूकीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, संतोष टाक, अशोक धांडे, पं. रवि ओम शर्मा, रमेश इखनकर, श्रीकृष्ण चोरवडकर, गोकुळ अग्रवाल, यशवंतसिंग चौधरी, गणेश गुरव, अक्षय वर्मा, पवन दरगड, विश्वज्योती मंडळ, अलंकर मंडळ, चेतना मंडळ, आपले मंडळ, उपकारमंडळ, जयलेवा गृ्रप, सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, दिनेश महाजन, अजय पाटील, सचिन पाटील, बबलू बर्हाटे, उमाकांत शर्मा, इखनकर बंधऊ, अमोल सोनार, चेतन शिरनामे,रोहीत नेमाडे, सागर शिंदे, धनराज सोनार, सोमनाथ चौरसिया, चिंटू झंवर, हरी तिवारी, सोनू शेठ, राममंदिर वार्ड, व विठ्ठल मंदिर वार्डातील संपूर्ण कार्यकर्ते व मंडळ तसेच श्रीमती विमल रामदास वैष्णव, मेघा वैष्णव,भारती वैष्णव, रितीका चौरसिया, पुजा गुरव, उमेश नेवे, राजश्री नेवे आदींनी केले आहे.



