डंपरने दूध संघाच्या दोन वाहनांना उडवले : एक ठार; तीन जखमी : भुसावळ नवोदय विद्यालया समोरील घटना :

भुसावळ – भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने जिल्हा दूध संघाच्या दूध वाहून देणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली असून या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झालेले आहेत.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की वेगाने धावणाऱ्या डंपरने राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा दूध संघाच्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात नवोदय विद्यालयाच्या समोर झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघातामुळे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या अपघातामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर गाड्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.