भुसावळ – सियावर रामचन्द्र की जय , जय श्री रांम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र की जय जय श्री राम च्या गगनभेदी ,घोषणांनी परिसर दणाणला. शहरातून रामभक्तांनी विविध भागातुन मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला .
कोरोना महामारिच्या संकटामधून प्रभु श्रीरामाने तारले .म्हणून दोन वर्ष निरुत्साही असलेल्या भाविक भक्तांनी उत्साहाने आनंदाने सहभागी होत उत्सव साजरा केला.शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
लक्ष्मी चौक राम मंदीर–
शहरातील पुरातन चौकांच्या श्रीराम मंदिरात राम नवमी निमित्त आठवड्यापासून भजन संध्या व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . प्रसंगी हभप देवेंद्र जोशी यांनी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत कीर्तन करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.यानंतर महाआरती होऊन प्रसाद वाटण्यात आला. यानंतर भजन, महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . भाविकांनी सकाळ पासून दर्शनासाठी रिघ लावली होती. सोहळा यशस्वितेसाठी सरिता चौक, राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोटेचा, गोपाल चांडक, चंद्रकांत चव्हाण, प्रशांत भोंडे, प्रो. सुचिक, दिलीप ओक, विहिपचे नारायण घोडके, दिलीप कलाल, सुरेश शिंदे, योगेंद्र हरणे, विनोद उबाळे, प्रविण डोलारे, राकेश शर्मा, संजय यावलकर, श्रीकांत लाहोटी, प्रसाद पवार, महेश भावसार, सुभाष शिरसाळे, विनोद शर्मा, सिमा डोलारे, सरीता चौक, शोभा राजने, सरोज कविश्वर, सुनीता कुलकर्णी, शकुंतला पाठक, सुनंदा तारांबळे, अनिता दिक्षीत, विशाखा नाईक, आरती देशपांडे, रश्मी कुलकर्णी, प्राजक्ता चौक, स्वाती देव, सविता चौक, पंकज चौक, आशिष कुलकर्णी, अतुल देशपांडे, प्रगती कुलकर्णी, पल्लवी गचके, किसन बर्हाटे, कैलास कुरकुरे, ब्रिजेश लाहोटी उपस्थित होते. सरिता चौक यांनी आभार मानले.
लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान– येथे प्रभु श्रीराम जयंती व रामदास स्वामी यांची जयंती निमित्ताने दुपारी १२ वा. पूजा अर्चा, अभिषेक होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, दीपक काबरा, जे. बी, कोटेचा, भवरलाल दरगड, राजेश चांडक, रामवल्लभ झंवर, मिलिंद अग्रवाल, सुरेश काबरा, मधुलता शर्मा, जयंतीलाल सुराणा, गौतम चोरडिया, संदीप देवडा, सचिन डेलीवाला, राजेश बाफना, आदी भाविक उपस्थित होते.
राममंदिर वार्ड –
येथील श्री बडा हनुमान मंदिरात श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे ४ वा प्रभुश्री रामाचा महाअभिषेख करण्यात आला. भगवंताचा सुन्दर श्रृंगार करण्यात आला. दुपारी १२ वा उत्सवाची महा आरती करुन पंजेरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. सायं ८ ते रात्रि उशिरा पर्यन्त संगीतमय सुन्दर कांड व भजनाचा कार्यक्रम पार पडला. उत्सवाच्या यशस्वीतेतेसाठी श्री बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव, गोविन्द अग्रवाल, मोंटू वर्मा, अनूप अग्रवाल, संतोष टाक, गोकुळ अग्रवाल, भारती वैष्णव, पूजा गुरव, श्रीमती विमल वैष्णव, मेघा वैष्णव, अशोक धांडे, रितिका चौरसिया, सोमनाथ चौरसिया, रमेश इखनकर आदिंनी परिश्रम घेतले.
सर्व शक्ती सेना– प्रभु श्रीरामचंद्र जन्मोत्सव रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय मोरे होते. सुरवातीला प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेला प्रा. मोरे, सचिव मयुर कोळी, जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी प्रा. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी सुभाष डागा, मयुर कोळी, कृष्णा सावळे, धनराज कोळी, गजानन काडेले, विजय तायडे, दीपक तायडे, दीपक चौधरी, जिजाबराव पाटील, प्रा. सुनील तायडे, सचिन सुरवाडे, विनोद ठाकरे, विनोद कोळी, प्रदीप पानपाटील, विकास सपकाळे, गोलू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

म्युनिसीपल पार्क श्रीराम मंदिर
म्युनिसीपल पार्क मधील श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता जन्मोत्सव झाला.
रविवारी सकाळपासून महाअभिषेक, पुजा, होमहवन आदी कार्यक्रम होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव व त्यानंतर सुंदरकांड पाठ झाले. सायंकाळी पाच ते रात्री दहा दरम्यान प्रसाद वितरण सुरु होते. सायंकाळी मिरवणूक झाली. केळी, साबुदाणा खिचडी व कैरीचे पन्हे आदींचे प्रसाद वितरण करण्यात आले. शनिवारी सायंकाळी राम नवमी निमित्ताने या भागातून शोभायात्रा काढण्यात आली.
श्रीराम जन्मोत्सव उत्सव समितीचे गोपी अय्यर, बालसुब्रमण्यम अय्यर, सुरेश अय्यर, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ यांनी सहकार्य केले
भाजयुमोतर्फे मिरवणूक
दरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे श्रीराम नवमीनिमित्त सायंकाळी नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरुन शोभायात्रा काढण्यात आली मिरवणूक जामनेररोड, जवाहर डेअरी, मरिमाता मंदिर, जूने पुरातन राम मंदिरात समारोप झाडा . यावेळी आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, राजेंद्र आवटे, प्रा. दिनेश राठी, संतोष बारसे, महेंद्रसिंग ठाकूर, गिरीष महाजन, सतीष सपकाळे, अजय नागराणी, प्रकाश बतरा आदी सहभागी होते . भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहे.
…………………


