भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी आय आय टी मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान मेळावा टेकफेस्ट मधील रोबो वार स्पर्ध्येमध्ये उपविजेतेपद पटकावले. दहाहुन अधिक देशांचा सह्भाग असलेल्या ह्या स्पर्धेत अंतिम फेरित धडक मारली. अंतिम फेरित अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ब्लॅंकाच्या रोबोला ब्राझील च्या रोबोने मात दिली. त्यामुळे मागील काही वर्षांच्या स्पर्धांमध्ये सलग विजय मिळवणाऱ्या गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लॅंका बोट्झ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आय आय टी टेकफेस्ट बरोबरीनेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असलेली स्पर्धा म्हणजे गुजरात राज्यातील पारुल युनिव्हर्सिटी आयोजित तंत्रविज्ञान मेळावा . ह्या मेळाव्या दरम्यान आयोजित रोबोटिक्स स्पर्धा सुद्धा गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लॅंका बोट्झ संघाने गाजवल्या. ह्या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस आणि रोबो वार ह्या दोन स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योगांना अपेक्षित उपयोजित ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून काम करण्यासाठी महाविद्यालयात आम्ही मल्टी डिसीप्लिनरी सेल स्थापन केलेला आहे. पारंपरिक ज्ञांनाबरोबरीनेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भविष्यावेधी रचना करण्यासाठी ह्या सेल द्वारे आम्ही प्रयत्न करत असतो आणि नव नवीन संरचना सादर करत असतो त्याच प्रयत्नातून साकारलेल्या रोबोट्सचा विजय हा अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या संघांबरोबर लढण्याचा अनुभव वेगळाच असतो, अपेक्षांवर थोडे कमी पडल्याची खंत असली तरी हा अनुभव खूप काही शिकवून गेला असे शुभम नेमाडे आणि विरेन्द्र खंडागळे यांनी सागीतले.
संघात रोहित चौधरी, प्रणय शेवाळे, अराफात अहमद, शाह्बाज गवळी, शुभम झाम्बरे अमित तिवारी, मोहित बारस्कर, नायर गौतमकृष्ण अरुण, गौरव महाजन, राहुल न्हावकर, भुशण गोर्दे, अभय नरेंद्र महिरे, धिरज बेहरानी, सौरभ नितिन चौधरी आणि निशांत किशोर भंगाळे यांचा समावेश होता.
तांत्रिक ज्ञान, संघ समन्वय आणि सराव ह्या संतुलित त्रीसूत्रीतून हा विजय साकारल्याचे ब्लँका बोट्झ समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील, प्रा. नितिन खंडारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



