हुवाई मार्फत आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान प्रशिक्षण परीक्षेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश : कल्याणी कोळी व अर्चना खलसे यांनी १०० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी हुवाई (HUAWEI) बरोबर सामंजस्य करार केला असून ह्या अनुषंगाने महाविद्यालयात हुवाई (HUAWEI) मार्फत आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येते. भविष्यवेधी व उदयोन्मुख तंत्रज्ञाचा वेध घेत प्रगत आणि येऊ घातलेल्या तंत्रज्ञान बदलांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याहेतूने ह्या केंद्र मार्फत विद्यार्थी व विद्याथिनिंना प्रशिक्षित केले जाते.

त्या अंतर्गत महाविद्यालयातील प्रशिक्षण केंद्रात क्लाऊड कॉम्प्युटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या आधुनिक तंत्रशाखांमधील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते एकूण ५८ विद्यार्थी व विद्याथिनिंनि प्रशिक्षणात सहभाग नोंदवल्याचे प्रशिक्षण केंद्र समन्वयक प्रा आय डि पॉल यांनी कळवले आहे.
समारोपप्रसंगी घेण्यात आलेल्या परीक्षे दरम्यान कल्याणी राजेंद्र कोळी व अर्चना संजय खलसे यांनी १००० पैकी १००० म्हणजेच १००% गुण मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

प्राध्यापक अनिकेत पाठक यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग या विषयाचे मार्गदर्शक म्हणून तर प्राध्यापक राम अग्रवाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिलें.
विशेष गुणवत्ता प्राप्त विद्याथिनिंच्या कौतुक सोहोळ्याप्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी बोलतांना सांगितले कि शैक्षणिक, तांत्रिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रचंड संधि ह्या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देत भावी तंत्रज्ञान बदलासाठी उद्योगधंद्यांना अपेक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न असून त्या अनुषंगाने आम्ही दमदार पाऊले उचलली आहेत हुवाई (HUAWEI) बरोबर अनुबंध व प्रशिक्षण हा त्याचाच एक भाग.

हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.

आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील, केंद्र समन्वयक प्रा आय डि पॉल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.