भुसावळात राजस्थानी समाजाच्या गणगौर उत्सव मिरवणुकीने वेधले लक्ष –


भुसावळ : दरवर्षाप्रमाणे यंदाही राजस्थानी समाजातर्फे गणगौर (शिव पार्वती) उत्सव मोठ्या उत्साहात सोमवारी साजरा करण्यात आला. होळीच्या सणानंतर महिला शीतला मातेची पंधरा दिवस पूजा-अर्चा करण्यात आली. या पार्श्वभुमीवर राजस्थानी समाजातर्फे गणगौर उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्री अग्रसेन भवन येथील महिला मंडळाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला दिनानिमित्त होमगार्ड महिला व कोरोना रक्षक महिलांचा सत्कार करण्यात आला. येथे सर्वानुमते नवीन अध्यक्षा म्हणून अ‍ॅड.कल्पना टेमाणी यांची निवड करण्यात आली. होळी साजरी करण्यात आली, या अंतर्गत विविध रंगारंग कार्यक्रम तसेच फुलांची होळी व थंडाईचे आयोजन केले होते. त्याचप्रमाने गणगौर उत्सव साजरा करण्यात आला. 25 मार्चपासून दररोज संध्याकाळी लहान बालाजी मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. सोमवार, 4 रोजी संध्याकाळी मोठी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात अग्रवाल नवयुवक संघाच्या व अखिल भारतीय राजस्थानी समाजाच्या सहकार्याने मोठे बालाजी मंदिर येथे राजस्थानी पारंपरीक वेशभूषात गणगौर गीत व नृत्य उत्सवात समापण करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
महिला मंडळाच्या अध्यक्षा अ‍ॅड.कल्पना कमल टेमाणी व प्रोजेक्ट चेअरमन संगीता अग्रवाल, नेहा अग्रवाल, निकिता अग्रवाल, रेखा अग्रवाल, व सहयोगी सदस्य नंदा अग्रवाल, रीतु अग्रवाल, संगीता सतीश अग्रवाल, रूपा अग्रवाल, कामिनी अग्रवाल, समता अग्रवाल, रुपाली अग्रवाल, शीतल अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, कृष्णा अग्रवाल यांच्यासह राध्येश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, अ‍ॅड.गोकुळ अग्रवाल, जे.बी.कोटेचा, बंडू महाराज, अनुप अग्रवाल, विनोद शर्मा, श्याम अग्रवाल, रवी अग्रवाल, प्रवीण भराडीया, मयूर नागोरी यांच्यासह अग्रवाल महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, ब्राह्मण समाज महिला मंडळ तसेच समस्त राजस्थानी मंडळ कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.