विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर इंटरॅक्ट क्लब स्थापन करा – रमेश मेहेर

भुसावळ –  शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये शासन स्तरावरील उपक्रमांना प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोटरीच्या माध्यमातून बाल वयामध्ये भविष्यातील सुजाण नागरिक व चांगली पिढी विकसित वावी यासाठी इंटरॅक्ट क्लब ची स्थापन करावे  या योजनेचा लाभ मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना करून द्यावा व त्यांच्यामधील सर्वांगीण विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले

शहरातील रोटरीच्या चार क्लबचे निरीक्षण व परीक्षणासाठी प्रांतपाल रमेश मेहेर हे शहरात दाखल झाले आहेत त्यानिमित्त ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रथमोपचार मिळावे यासाठी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली च्या वतीने प्रथमोपचार पेटी वाटपाचा कार्यक्रम दिपनगर तालुका भुसावळ येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात करण्यात आला
या प्रथमोपचार पेटी मध्ये प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य सोबतच मुलींसाठी सॅनिटरी पॅड चे समावेश करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये परिसरातील पंधरा शाळांना पेटीचे वाटप करण्यात आले लवकरच इतर शाळेत देखील ही पेटी देण्यात येणार आहे 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ संजू भटकर हे होते तर प्रथमोपचार पेटी वाटप प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्लबचे सेक्रेटरी जीवन महाजन ट्रेझरर सुनील वानखेडे विद्यालयाचे प्राचार्य जी डी चौधरी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली च्या नूतन अध्यक्ष नूतन फालक सेक्रेटरी मनीषा पाटील प्रोजेक्ट चेअरमन मीना नेरकर को चेअरमन राहुल सोनार पर्यवेक्षक जे बी पाटील आदी उपस्थित होते 

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ संजू भटकर म्हणाले की ग्रामीण भागातील समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे ग्रामीण भागा मुळेच शहरी भाग समृद्ध आहे यामुळे गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले असून येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गरजा सांगाव्यात त्यानुसार पुढील कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश अग्रवाल यांनी तर आभार धर्मेंद्र मेंडकी यांनी मानले

शारदा माध्यमिक विद्यालय इंटरॅक्ट क्लबचे मानकरी

रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली च्या वतीने शाळा स्तरावर श्री शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या उपस्थितीमध्ये इंटरॅक्ट क्लब ची स्थापना करण्यात आली या क्लबचे अध्यक्ष ओम आवारे तर सचिवपदी मोहिनी सपकाळे यांची निवड करण्यात आली या क्लब मध्ये एकूण 16 विद्यार्थ्यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत

प्रथमोपचार पेटी वाटप स्तुत्य उपक्रम

अनुदानित शाळांमध्ये शासनाकडून इतर अनुदान मिळत नसल्याने दररोजच्या दैनंदिन खर्चाविषयी अडचणी निर्माण होत असतात त्यात शाळांना शासकीय रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार साहित्य मिळत नाही यामुळे विद्यार्थ्यांना खरचटले अथवा लागले असता तात्काळ खाजगी रुग्णालय गाठावे लागते मात्र रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली ने प्रथमोपचार पेटी वाटप करून एक चांगला स्तुत्य उपक्रम केला आहे यामुळे आता शाळेमध्ये प्रथमोपचार साहित्य उपलब्ध राहील 

एस एस अहिरे पर्यवेक्षक पंडित नेहरू विद्यालय तळवेल