भुसावळ – घटस्फोटित, विधवा, विधूर, प्रौढ , शेतकरी, अपंग यांचा
१० वा घटस्फोटित विधवा, विधुर मेळावा आज 3 एप्रिल रोजी संतोषीमाता हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी भावी कुटुंब नायक ललित रमेश पाटील अध्यक्ष स्थानी होते. तर भावी कुटुंब नायक ललीत पाटील, भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ बाळू पाटील, सुहास गोपाल चौधरी, माजी आमदार निळकंठ फालक, उपक्रम चेअरमन आरती चौधरी, महेश फालक. शरद फेगडे, मंगला पाटील, डिगंबर महाजन,आर. जी. चौधरी, परीक्षित ब-हाटे, जळगाव च्या जोत्स्ना ब-हाटे, नीला चौधरी, चंदन महाजन, सुनील खडके, विनीत हंबर्डिकर, मनोज जावळे, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात नागपूर, पुणे, मुंबई, इंदुर, अकोला, जळगाव, भुसावळ, यावल रावेर तालुक्यातील लोक सहभागी झाले होते .
मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी निस्पृहपणे समाजात सेवा करणारे प्राची राणे, मनोज जावळे, दिनेश राणे, वासुदेव इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वधूवर सूची प्रकाशित करण्यात आली .
प्रारंभी उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच 19 एप्रिलला होणाऱ्या चौथ्या सामुहिक विवाहा संबंधित माहिती देऊन समाजातील खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा म्हणून हा उपक्रम घेत असल्याचे सांगितले. या सुचीचा फायदा घटस्फोटित विधवा विधुर प्रौढ लोकांनी घेऊन आनंदी वैवाहिक जीवनाची सुरवात करावी.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी सांगितले की आजकाल मुलामुलींची सहनशक्ती कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. लग्नानंतर प्रेग्नंट असलेल्या मुली विचार न करता घटस्फोटा साठी येतात तेव्हा खूप वाईट वाटते. पण आम्ही जोडण्याचाच प्रयत्न करतो. तर माजी आमदार निळकंठ फालक यांनी विचार मांडले व सांगीतले १० वर्षापासून हा मेळावा व सुची प्रकाशित होत आहे. फक्त पुण्याला असा मेळावा होत होता. नंतर भुसावळला १० वर्षापुर्वी अशा प्रकारे मेळावा घेणे हे धाडसाचे होते पण आम्ही घेतला व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हा पासून हा उपक्रम चालू आहे ते आजतागायत.
त्यानंतर अंजाळे येथील दानशूर सुधीर चौधरी यांनी स्वइच्छेने सामुहिक विवाहासाठी ५०००रु.ची देणगी जाहीर केली.
या नंतर मान्यवरांच्या हस्ते सुची प्रकाशित करण्यात आली १० मुली व 17 मुलांनी परिचय दिला. या मेळाव्यात एका घटस्फोटीत मुलीचा विवाह जुळला तर एका विधवा मुलीचा विवाह ठरवण्याच्या मार्गावर आहे. ( मुलीचे वडील उपस्थित नसल्याने जाहीर केले नाही). या मेळाव्यात नागपूर, पुणे, मुंबई, इंदुर, अकोला, जळगाव, भुसावळ, यावल रावेर तालुक्यातील लोक उपस्थित होते. एकंदरीत 400 लोकांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पल्लवी ढाके व डॉ. बाळू पाटील यांनी केले. मेळाव्यास लेवा उत्थान मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले ,असे उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी कळविले आहे.



