भुसावळ – शहरात मागील महिन्यात बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, दरोडे, भरदिवसा चोऱ्या तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी त्यात भर टाकणारी स्टेशन परिसरातील तीन कापड दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे एक आव्हान होते. यातिल दोघा आरोपीस उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले.
याबाबत फिर्यादी हरिकृष्णा रेडिमेड शॉप व यांचे दुकानाशेजारी असलेले गुरुनानक शॉप व गोपी शॉपिंग मॉल मध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून दिनांक २२/०३/२०२२ रोजी रात्री १२.५२ वाजेच्या
सुमारास रेल्वे स्टेशन परिसरामधुन अज्ञात चोरट्यांनी ३६,६७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा झाले होते. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन १२८/२०२२ कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी कलवा नबाब खान वय २३ राहणार किशोर पाडा रुंदावन मथुरा उत्तर प्रदेश श्याम कुमार प्रदीप सैनी वय २७ राहणार आशा नगर, मेहंदी पार्क मथुरा उत्तर प्रदेश मधून दिनांक ११/०३/२०२२ रोजी रात्री ०९.०८ वाजेला ताब्यात घेतले व भुसावळ बाजारपेठ जमा करून दिनांक १४/०३/२०२२ रोजी अटक दाखविण्यात आली असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक १७/०३/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे. तर गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शांताराम महाजन, पोह. विजय नेरकर, सचिन चौधरी, जीवन कापडे, सचिन पोळ अशांनी मिळून केली.



