संस्कार करतांना आपण कुठे कमी पडतोय , आत्मचिंतनाची गरज – समीर दरेकर : जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ व हिंदू जागरण मंच द्वारा ‘पणतीला जपताना’ व्याख्यान संपन्न : भुसावळकरांचा भरभरून प्रतिसाद :


भुसावळ – जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे पणतीला जपताना
या पुस्तकाचे लेखक व वक्ते समीर दरेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. भुसावळातील महिलांनी व पुरुषांनी या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला. तसेच भुसावळ तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते समीर दरेकर यांनी महिलांच्या संदर्भातील संवेदनशील विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.आज दर वर्षी किती तरी मुली बेपत्ता होताय त्यांचा कुठेच पत्ता लागत नाहीये मुलींचे अपहरण करून त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण कसे केले जाते हे उदाहरण देऊन सांगितले. लहान वयाच्या मुलींना कसे प्रेमाच्या जाळ्यात फसवले जाते त्या साठी चक्क प्रशिक्षण दिले जाते व त्यांचे कश्या पध्द्तीने धर्मातरण केल जाते हे सांगून सर्वांनच्या हृदयाचा ठोका चुकवला.महिलाच्या शोषण,बेपत्ता होणे व धर्मांतरण संदर्भातील बरेच किस्से त्यांनी पुराव्यानिशी सांगितले.या वर पालकाची भूमिके वर बोलतांना सद्या मुलां वर संस्कार करण्यात आपण कुठे कमी पडतोय हे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे असे सांगितले. कॉन्व्हेंट शाळेत शिकणाऱ्या मुलांना आपल्या धर्मा बद्दल, देशातील संत महात्मा,महान पुरुष व स्त्रीया तथा आपल्या देशातील गौरवशाली इतिहास बद्दल माहिती देणे गरजेचे आहे. आपल्या सणांची माहिती सांगणे व महत्वाचे म्हणजे मुलां सोबत संवाद साधणे गरजेचे आहे असे ठासून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी केले ज्यात त्यांनी मंडळाच्या उपक्रमा बद्दल माहिती दिली व आमदार संजय सावकारे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असेही सांगितले. कार्यक्रमाचा उद्देश सांगताना त्यांनी महिलां व मुली संदभातील ज्वलनशील प्रश्न का उपस्थित झाले, असे का घडत आहे आपण कुठे कमी पडतोय,धर्मनिष्ठा का कमी होतेय त्यावर आपण महिला काय करू शकतो हे सांगितले.. सोनू मांडे यांनी मुली आईवडिलांच्या भावनांचा विचार न करता खोटे आमिषाला कसे बळी पडतात हे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दिशा, सुनिधी,आरोही,सही व रुपाली यांनी गणेश वंदनाने केली प्रसंगी सात वर्षीय नुपूर भालेराव हीने देवी स्तुती वर अप्रतिम नृत्य करून उपस्थितांची मने जिकली.
व्यासपीठावर खासदार श्रीमती रक्षा खडसे,प्रमुख वक्ते समीरजी दरेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सौ रश्मी शर्मा,सौ संगीता बियाणी,सौ आरती चौधरी,प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष सौ रजनी सावकारे सचिव श्रीमती लता सोनवणे हिंदुजागरण मंचचे जिल्हा संयोजक योगेश बाविस्कर सोनू मांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ अलका भटकर व प्रा राजेश्री देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील सदस्य सौ सरला सावकारे,मनीषा काकडे,सौ लता सोनवणे, सौ अनिता आंबेकर, सौ सुनंदा भारुळे,सौ जयश्री चौधरी, सौ श्रद्धा चौधरी,सौ रिया पिंपळे, सौ अनिता महाजन,सौ मोनिका ढाके,जयश्री ढाके,सौ पदमजा दरगड,सौ प्राची भदाणे व संपूर्ण टीम ने यांनी सहकार्य केले.
भुसावळातील 32 कर्तुत्ववान महिलांचा झाला सन्मान
तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ पांढरे , वैदयकीय अधिकारी भुसावळ नगरपालिका डॉ कीर्ती फलटणकर , अंगणवाडी सुपरवायझर(ग्रामीण)
रेखा कटलर ,अंगणवाडी सुपरवायझर(ग्रामीण)
सौ जयश्री दवे अंगणवाडी सुपरवायझर(शहरी)
सौ वैशाली सावदेकर
सपोनि रुपाली चौहान शहरी भागातील 160 बचतगट सांभाळणार्या व महिलांना मार्गदर्शन करण्यार्या सौ योगिता कासार स्वतः चा गृह उद्योग उभारणार्या
सौ शिल्पा लोखंडेभुसावळ मधील पहिली रिक्षाचालक महिला
सौ रंजनाताई कोळी
नाट्य स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
सौ अलका भटकर
जेष्ठ नागरिक मध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे कार्य करणार्या
सौ सुनंदा औंधकर
महिला आरोग्यासाठी जागृत करणाऱ्या
सौ महानंदा पाटील
वय वर्ष 81 असूनही घरी व इतरत्र प्रदर्शनात सहभागी होऊन आजही आत्मनिर्भर असणाऱ्या
श्रीमती अयोध्या मंत्री
7 वर्ष वय असलेली देश विदेशात नृत्य परफॉर्मन्स देणारी
कुमारी नुपूर भालेराव
सक्षम फाउंडेशन च्या कौन्सिलर
सौ आरती ताई चौधरी ,सौ जयश्री प्रसाद काळवीट
आदर्श शिक्षिका मातृभूमी महिला शेतकरी गट व महिला शेतकरी विकासगट दूध देरी गट स्थापन तथा शेती तुन 40 एकर क्षेत्रात सुर्यफुला ची लागवड करणाऱ्या साक्री च्या
सौ वैशाली किरण चोपडे, सौ भारतीताई म्हस्के
शहर पोलिश स्टेशन महिला दक्षता कॉन्सिलर ,कुमारी हंसिका महाले (5वी कक्षा आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा मध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्र मधून पहिला क्रमांक ,सौ जयश्री पुतांबेकर
नाट्य व चित्रपट अभिनेत्री ,सौ जया व कुमारी अनाधा खाचणे
कठीण परिस्थितीवर मात करणाऱ्या बाजारपेठ पोलीस स्टेशन च्या हेड कॉन्स्टेबल ,सौ गीता कश्यप ,प्रीति राजेंद्र चौधरी
आशा सुपर वायझर ,चंद्रकला जितेंद्र तायडे
आशा सेविका, आदर्श शिक्षिका
सौ मीरा जंगले ,आदर्श शिक्षिका
सौ कमल देवडा ,ग्रामीण भागातील 167 बचतगट सांभाळणार्या
सौ वंदना तायडे, आशावर्कर व कठीण परिस्थितीत संसार उभा करणाऱ्या श्रीमती दुर्गा गालफाडे
आदर्श शिक्षिका व कला शिक्षक ,सौ जयश्री चौधरी, अनुज ट्रेंनिग सेंटर संचालिका ,सौ अनिता आंबेकर ,ट्रॉमा केर सेंटर मध्ये लॅब टेक्निशियन
सौ निरंजना तायडे