कोरोना कहर कायम : जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळले 338 रुग्ण –

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात रविवार, 23 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 338 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

आतापर्यंत 2582 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 582 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार 885 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 42 हजार 59 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. रविवारी 221 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 119
जळगाव ग्रामीण 16
भुसावळ 87
अमळनेर 20
चोपडा 26
पाचोरा 02
भडगाव 05
धरणगाव 13
यावल 06
एरंडोल 00
जामनेर 08
रावेर 03
पारोळा 00
चाळीसगाव 25
मुक्ताईनगर 05
बोदवड 00
अन्य जिल्हा 03