भुसावळात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ;


भुसावळ – भुसावळात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी विविध समाजपयोगी भरगच्च कार्यक्रमांचे शिवसेना शहर भुसावळ तर्फेआयोजन करण्यात आले आहे .
याअंतर्गत रविवार रोजी सकाळी 11 वाजता बाजार पेठ पोलीस स्टेशन शेजारी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . तसेच अन्नदान, वृक्षारोपण, नगरपालिका दवाखान्यामध्ये आवश्यक असलेल्या वास्तूचे वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसैनिकांनी व बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शहर भुसावळ तर्फे करण्यात आले आहे
निबंध स्पर्धा
हिदुहॄदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर निबंध घरीच लिहून आणणे व बाळासाहेबांचे चित्र देखील घरीच काढून 23 जानेवारी रोजी कार्यक्रम ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यावे प्रसंगी प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येईल
विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक द्वितीय व तृतीय क्रमांक चे रोख बक्षीस सुद्धा 23 जानेवारी रोजी कार्यक्रमा ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशन शेजारी दिली जाणार आहे
मुकेश गुंजाळ
शिवसेना नगरसेवक 9823199197
उमाकांत शर्मा( नमा )
शिवभोजन संचालक 7276742714
मिलिंद कापडे
शिवसैनिक 9823944145 यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .