चोपडा – ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टा विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक,विशेष पथक यांना मिळाल्याने सोबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घेऊन सापळा रचून गावठी कट्टा मधील आरोपीकडून गावठी कट्टा व दोन राऊन्ड हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक,विशेष पथक तसेच चोपडा ग्रामीण यांना गोपनीय माहिती मिळाली की,गावठी कट्टा विक्री होणार आहे.त्या अनुषंगाने पथकातील सपोनी बशिर तडवी,हेड कॉ रामचंद्र बोरसे, पो ना मनोज दुसाने,हे कॉ राकेश पाटील, चोपडा ग्रामीण पोना रितेश चौधरी चोपडा ग्रामीण अशांनी 18 रोजी सापळा रचून गावठी कट्टा मधील आरोपी कट्टा घेणारा श्रावनसिह छोटु राजपुत वय 21,रा. भुरजगड ता.जि.जैसलमेर पलसवड ( राजस्थान) याला ताब्यात घेऊन गुन्हयातील मुद्देमाल गावठी कट्टा 25,000 रु.तसेच दोन राऊन्ड 2000 /रु.अशा एकुण मुद्देमाल 27000/रु.किंमतीचा हस्तगत करण्यात आला आहे.मात्र कट्टा देणाऱ्याचे नाव निष्पन्न करणे बाकी असून चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गुरन 11 /2022अर्म अँक्ट 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक,विशेष पथक तसेच चोपडा ग्रामीण यांनी मिळून सयुक्त कारवाई केली.


