भुसावळ : भुसावळ-ईगतपुरी दरम्यान, मेमू गाडी सोमवार, 10 जानेवारी रोजी तब्बल 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर धावली. यावेळी प्रमुख थांब्यावर मेमूचे प्रवाशांनी स्वागत केले .परंतु या प्रवासातील तब्बल सात थांबे रद्द करण्यात आले असून वाढीव मेल एक्सप्रेसचे भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली .
देवळाली शटलऐवजी आता धावणार मेमू
कोरोनाच्या काळात 22 मार्च 2020 रोजी देवळाली शटल बंद करण्यात आली. प्रवाशांच्या रेट्यानंतर व झालेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून नुकतेच नोटिफीकेशन काढण्यात आले होते मात्र भुसावळ-देवळाली पॅसेंजरऐवजी 10 जानेवारीपासून भुसावळ-ईगतपुरी मेमू चालवण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मेमूचे वेळापत्रक याप्रमाने
भुसावळ- ईगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटल्यानंतर ईगतपुरीला दुपारी तीन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ईगतपुरी येथून सकाळी 9.15 वाजता सुटून भुसावळ जंक्शनवर सायंकाळी 5.10 वाजता पोचेल. ही गाडी आठ डब्यांची असून मेल, एक्सप्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. ही गाडी लहान स्थानकांवर केवळ एका मिनिटासाठी थांबेल .यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.
भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही. यात वाघळी, पिंपरखेड, हिस्वल, समीट, पीजन, ओढा, लहाविट या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.


