भुसावळ -श्री शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर या ठिकाणी सावित्रीबाई जयंती निमित्ताने 3 ते 7 जानेवारी 2022 प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले . दिपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने 3 ते 7 जानेवारी 2022सावित्री ते जिजाऊ साप्ताहिक कार्यक्रम संपन्न झाले . त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.डी चौधरी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले . मुख्याध्यापक जी.डी चौधरीसर यांनी प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जे. डी. येवले यांनी केले तर श्रीमती नीलिमा पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. श्रीमती व्ही.एस. खाडे यांनी सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यान समोर मांडला . त्यावेळी अनेक विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर वकृत्व केले जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला दोन विद्यार्थिनींनी सावित्री बाई यांची वेशभूषा करून एकांकिका सादर केली.
4 जानेवारी 2022
उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री जी.डी चौधरी सर होते. मार्गदर्शक म्हणून शाळेतील शिक्षिका श्रीमती नीलिमा पाटील मॅडम यांनी इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनींना किशोर वयातील होणारे बदल मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास व येणाऱ्या अडचणी तसेच सनिटरी पॅड कसे वापरावे आणि कसे नष्ट करावे व त्या काळात स्वच्छता कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री जी. डी चौधरी सर यांनी वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी विद्यार्थीनीना मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सौ जे. डी येवले तर आभार सौ रुपाली राणे यांनी केले.
5 जानेवारी 2020
निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात तीन गट करण्यात आले देण्यात आले त्यासाठी चार विषय देण्यात आले त्यातून एका विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले. एकूण 62 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
6 जानेवारी 2022
शासनाच्या उपक्रमाअंतर्गत यशस्वी महिलांच्या यशोगाथा मुलाखत घेणे या उपक्रमा अंतर्गत श्री शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर या ठिकाणी समाजसेविका, स्री स्वातंत्र्य चळवळीच्या पुरस्कर्त्या शैला सावंत यांची प्रकट मुलाखत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विचार मंचावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मनमोकळ्या गप्पा टप्पा करण्यात आल्या त्यांनी त्यांच्या आयुष्याचे स्री जातिविषयक जीवनाचे वेगळे पदर विशद केले जगणं, वागणं , बोलण महिलांनी स्वावलंबी आणि सन्मानाने जगावे अस शैला सावंत यांच्या कार्य कृतीतून विद्यार्थ्यांना समजले
मुलाखत शाळेतील शिक्षिका नीलिमा विलास पाटील यांनी त्यांच्या जीवनात पटाचे विविध अंग लक्षात घेऊन प्रश्नांची शृंखला मांडून त्यांना त्यांच्या आयुष्यावर बोलतं केलं. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक श्री जी.डी चौधरी सर यांनी शैला सावंत यांचा पुष्पगुच्छ आणि नॅपकीन देऊन सत्कार केला. ज्येष्ठ शिक्षक डॉक्टर संजू भटकर यांनी शैला सावंत यांच्यासोबत घालविलेले सोनेरी क्षण विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होता.
7 जानेवारी 2022
उपक्रमाअंतर्गत आनंद नगरी यामध्ये शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांना असलेले छंद आणि छंदातून निर्माण केलेले विविध साहित्य शाळेत आणून त्याचे प्रदर्शने लावण्यात आले त्यातुन विद्यार्थ्यांनी त्यांच्यात असलेल्या की दाखविण्याचा प्रयत्न केला त्यात विद्यार्थ्यांनी पृष्ठ आणि क्राफ्ट पेपर पासून ग्रीटिंग्स वस्तू अनेक प्रकारच्या सुशोभित वस्तू, या प्रकारची तिकिटे जमा करणे नाणी जमा करणे निरनिराळ्या प्रकारचे शंख, शिंपले आणि रंगबिरंगी दगडे जमा करणे वैज्ञानिकांची माहिती असलेले वर्तमानपत्रातील कात्रणे जमा करणे चित्रकला स्केचेस तयार करणे, लोकरी पासून निराळे शोभिवंत वस्तू बनविणे, मायक्रोनच्या निरनिराळ्या शोभिवंत वस्तू बनविणे, मोचन पासून निरनिराळे दागिने बनविणे, लग्नाच्या पत्रिकेवर असलेले गणपतीचे कात्रण जमा करने , बिसलरी बॉटल पासून वस्तू तयार करणे असे अनेक प्रकारचे छंद जोपासत विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला.
या सर्व कार्यक्रमांसाठी शारदा परिवारातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



