श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण ;

भुसावळ- येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय व भुसावळ नगरपालिका विभागाच्या वतीने महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनसाठी “कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या”शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. आर.बी बारजिभे यांनी पुढाकार घेत या शिबिराच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या लसीकरणाला वेग दिला.

सदर आयोजनात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी सहभाग नोंदविला.
हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.