टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : मातृभूमी संघाने पटकाविला मॉर्निंग सीसी न्यू इयर चषक २०२२ :

भुसावळ:- जवळील साकेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग लगत जि. प. शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसी आयोजित “न्यू इयर चषक २०२२” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मातृभूमी संघाने अंतिम सामन्यात वीर भगतसिंग संघाचा ६८ धावांनी पराभव करत चषक पटकाविला.
गावातील खेळाडूंनी तयार केलेला मॉर्निंग क्रिकेट क्लब ने नवीन वर्षात क्रिकेटपटूंना मेजवानी म्हणून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेत गावातील स्थानिक ८ संघांनी सहभाग घेतला होता.

अंतिम सामन्यात मातृभूमी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ ओव्हर मध्ये तब्बल १०८ धावा कुठल्या यात निखिल पाटील याने फक्त ८ चेंडूत तब्बल ३८ धावा फटकाविल्या अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून निखिल ला गौरविण्यात आले.

खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

अंतिम सामन्यातील विजेते मातृभूमी संघाला जि प सदस्य रवींद्र पाटील यांच्यातर्फे ट्रॉफी, उपसरपंच आनंद ठाकरे यांच्यातर्फे ट्रॉफी, स्वर्गीय राणा हर्षल चव्हाण यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी , माजी ग्रा प सदस्य प्रवीण पवार यांच्या तर्फे १००१,विनोद परदेशी यांच्यातर्फे ११००, कृ,उ.बा माजी सभापती संजय पाटील यांच्यातर्फे ५००, रुद्र मेडिकल तर्फे ट्रॉफी, तसेच उपविजेता वीर भगतसिंग संघाला मॉर्निंग सीसी तर्फे ट्रॉफी, स्वर्गीय राणा हर्षल चव्हाण यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी जि प सदस्य रवींद्र पाटील यांच्यातर्फे ट्रॉफी,देण्यात आली व स्वर्गीय विजय मनोरे यांच्या स्मरणार्थ विजेत्या संघाला पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांनासुद्धा मॉर्निंग सीसी तर्फे व रवींद्र पाटील यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आले.

तसेच माजी ग्रा प सदस्य विलास ठोके यांच्यातर्फे उत्कृष्ट कॉमेंटेटर रमजान पटेल यांना पाचशे रुपये देण्यात आले.
नरेंद्र पाटील यांच्यातर्फे ५० धावा काढणाऱ्या खेळाडूस १०१ बक्षीस देण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत पंच म्हणून डॉक्टर दीपक पाटील, पप्पू पटेल, योगेश पाटील, नितीन पाटील, मोसिन पटेल छोटू पाटील, पप्पू राजपूत, यांनी पंच म्हणून तर कॉमेंटेटर म्हणून रमजान पटेल वासेफ पटेल, आनंद ठाकरे गुणलेखक म्हणून राजू भोईटे, निलेश सपकाळे यांनी काम बघितले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन दिवसीय स्पर्धेत ग्रामस्थांनी मनसोक्त क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला.
मॉर्निंग सीसी च्या सर्व खेळाडूंनी स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.