भुसावळात पतीने केला पत्नीचा खून : अवघ्या चार तासात पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद: कौटुंंबिक वादातून खुन झाल्याचा संशय ;


भुसावळ : शहरातील कवाडे नगर भागात रहिवासी असलेल्या महिला सौ सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण खून झांल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली .
दरम्यान पहाटेच्या सुमारास आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात
एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलिस यंत्रणेने धाव घेतली. यावेळी अप्पर पोलिसअधिक्षक चंद्रकांत गवळी , पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांना नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.त्यावरून मयत महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे ,रा. कवाडे नगर, भुसावळ यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले असून. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे
संशयीत आरोपी पतीने सुचिता बारसे (25) व शुभम बारसे यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असल्याने दोघांचे वाद विकोपाला गेले आरोपीने पत्नीला एका ठिकाणावरून नेत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात रात्रीच्या सुमारास आणले. घरातील चाकूच्या सहाय्याने पत्नीवर आधी सपासप वार केले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी आरोपी विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.