भुसावळ – येथील खरात गँगचे हद्दपारी संदर्भातील अपील विभागीय आयुक्त यांनी नाकारले असून तडीपारी आदेश कायम ठेवले आहे या निकालामुळे शहरातील गुन्हेगार व हद्दपार असलेले गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

येथील भाजपाचे नगरसेवक मयत स्व रविंद्र खरात यांचे मुले अतिष रविंद्र खरात, राज उर्फ सनी रविंद्र खरात , हंसराज रविंद्र खरात , राजन उर्फ गोलु रविंद्र खरात , अमोल शाम खिलारे सर्व रा. समतानगर, भुसावळ यांना भुसावळ शहरातून हद्दपार केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक जळगाव यांनी दि. 5/8/21 रोजी दिले होते . मात्र सदर तडीपार आदेश अपीलार्थी खरात गॅगला मंजूर नसल्याने यांनी मा.विभा आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांचे न्यायालयात अपिल दाखल केले होते त्या केलेल्या अपीलाचा निर्णय मा.विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिनांक २०/१२/२०२१ रोजी दिलेला असून हे अपिल विभागीय आयुक्त यांनी फेटाळले असून पोलिस अधिक्षक जळगाव यांचे कडील हद्दपार आदेश आदेश जा क्र ३६८६/स्थागुशा/हद्दपार आदेश/२०२१ दि ०५/०८/२०२१ हा कायम करण्यात आला
आहे.


