भुसावळ : अप 22737 बिकानेर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाकडील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी बबली करण चव्हाण (25, बंजारा, रा.घर नं. 40/1, मॉडेल ग्राउंड, बड बाग शहानहाबाद, भोपाल म.प्र.) या महिलेला अटक केली असून चोरीतील मोबाईल जप्त केला आहे.
बर्थवरून लांबवला मोबाईल
नरेंद्र पुसालालजी सेन (53, रा.पाशर्वनाथ नगर 2, बालहंस
स्कुलजवळ, परीहार नगरच्या मागे भदवासिया, जोधपुर राजस्थान ) हे 16 डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 22737 अप बिकानेर एक्स.चे कोच नं. एस /10 बर्थ नं. 24 वरून प्रवासात असतांना गाडी रेल्वे स्टेशन भुसावळ येथे उभी असतांना 25 वर्षीय महिलेने बर्थवर ठेवलेला मोबाईल नजर चुकवून चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक काजवे, भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे हवालदार अजीत तडवी, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपुत, महिला हवालदार गायत्री पोरटे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय प्रेम चौधरी, वसंत महाजन आदींनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशयीत आरोपी बबली करण चव्हाण (बंजारा, 25, रा. घर नं. 40/1, मॉडेल ग्राउंड, बड बाग शहानहाबाद, भोपाल म.प्र.) महिला अटक केली तसेच चोरीतील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. तपास हवालदार श्रीकृष्ण निकम हे करीत आहे.




