भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळ येथे महाप्रबंधक वसंत निमजे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली,
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी 19 रोजी सकाळी 6 वाजता अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक
मिनी मॅरेथॉन हॉस्पिटलपासून संपूर्ण इस्टेट ते कम्युनिटी हॉल पर्यंत काढण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना महाप्रबंधक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
त्यांनंतर कम्युनिटीहॉल च्या आवारात महाप्रबंधक यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

या कार्यक्रमात महाप्रबंधक यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगतआपल्या संपूर्ण इस्टेट व कारखाना उत्पादन क्षेत्रातील स्वच्छतेचे महत्व सांगून
सुका कचरा ओला कचरा
वेग वेगळा ठेवण्या बरोबरच निर्माणी इस्टेट मध्ये दररोज कचऱ्याची गाडी फिरते, सर्वांनी कचरा कचऱ्याच्या गाडीतच टाकावा. असेही त्यांनी सांगितले
यावेळी त्यांनी स्वच्छ निर्माणी सुंदर निर्माणी असा नारा दिला
या कार्यक्रमात अप्पर महाप्रबंधक एस सरकार सर्व वरिष्ठ अधिकारी, जेसीएम फोर्थ चे सदस्य कार्यसमिती, चे सदस्य आणि सर्व युनियन असोसिएशनचे प्रतिनिधी, स्पर्धेतील विजेते व त्यांचे पालक, निर्माणी कर्मचारी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अशी माहिती निर्माणीचे पी.आर.ओ बी. देवीचंद
( डी जी एम ) यांनी दिली .


