उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते भुसावळातील सामाजिक कार्यकर्त्या अंजुम खान कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – येथील एम आय तेली स्कुलच्या शिक्षिका तथा समाजसेविका अँड . अंजुम खान यांना भुसावळ नगर्परिषदेतर्फे कोरोना योद्धा म्हणून पुरस्कृत करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता जुना सातारा भागात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्यां विविध स्तरातील व्यक्ती, पोलिस , डॉक्टर्स, आशा वर्कर , शिक्षक , पत्रकार , प्रेस फोटोग्राफर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, , माजी मंत्री एकनाथराव खडसे , खासदार. रक्षाताई खडसे ,माजी मंत्री आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, नगराध्यक्ष रमण भोळे, विष्णु भंगाळे , माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अँड रविन्द्र भैया पाटील , उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , प्रा सुनील नेवे , नगरसेवक आदीं मान्यवर उपस्थित होते .
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल महमूद पठान, कौसर पठान, इसरार खान, इमरान खान, इफ्तेखार पठान,सलमान ,समीर , सुल्तान हैदर , हसनैन, इब्राहिम, नूर ,मुज्जमिल, रेहान अली , आवेश यांचेसह समस्त पठान परिवार तसेच भारती म्हस्के , जयश्री इंगळे , पत्रकार उज्वला बागुल , निरंजना तायडे, राजश्री सोनावणे, राजश्री सुरवडे , संगीता भामरे , आर्या फाउंडेशन अध्यक्षा डॉ वंदना वाघचौरे , हिरकणी गृप च्या सुवर्णा , बबीता, तस्लीमा पूर्णिमा , रामटेके, मोनिका , छाया , एडव्होकेट जास्वंदी भंडारी, आरती चौधरीं , तनुश्री , व एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल सर्व स्टाफ , पत्रकार बांधव , स्वराज संघ , पोलिस मित्र व दक्षता समिति भुसावळ सदस्या ,जर्जिस फाउंडेशन ,अयूब भाई , यूसुफ बाबा, इदरीस भाई , आरिफ मेम्बर ओसामा साहब , इलियास भाई ,वारिस हाजी , समद सर, वाजिद सर , आशिक तेली इकबाल देशमुख, आकाश इगडे, ऋषि इगडे,व अँड अभिजीत, जळगांव मानिनी गृप , अध्ययन पैरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल प्राचार्य मनिषा व स्टाफ यांचेसह
समाजातील सर्व स्तरातून मान्यवारांनीं अभिनंदन केले असून शुभेच्छाचां वर्षाव होत आहे . .