भुसावळ – येथील जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब ने भुसावळ येथे आयोजित केलेला जिल्हा कबड्डी निवड चाचणी राष्ट्रवादी चषक जळगांव येथील महर्षी वाल्मिक संघाने पटकावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दोन दिवसीय जिल्हा निवड चाचणी स्पर्धांचा राष्ट्रवादी चषकाचे आयोजन जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबने केले होते. अंतिम चुरशीचा सामना जळगांव येथील महर्षी वाल्मिक संघ व क्रीडा रसिक संघ जळगांव यांच्या दरम्यान झाला, त्यात महर्षी वाल्मिक संघाने बाजी मारली. तृतीय पारितोषिक जळगांव येथील नेताजी सुभाष संघाला मिळाले.
पारितोषिक वितरण प्रसंगी राष्ट्रवादी जळगांव जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार मनिष दादा जैन, राष्ट्रवादी चे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष राम पवार , राष्ट्रवादी चे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवलेआणि जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, बाबूसेठ चोरडिया, रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशन चे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले तर आभार स्पोर्ट्स क्लब कार्याध्यक्ष चैत्राम पवार यांनी मानले.
दोन दिवसीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जय गणेश स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष निलेश कोलते, फाऊंडेशन सचिव तुषार झांबरे, प्रविण गोविंदा पाटील,शरद लोहार, सुमित यावलकर, हर्षल वानखेडे, रवी जोनवाल नचिकेत यावलकर, करण जाधव, पियुष गुरव, आर्यन मुळकूटकर, ओम चौधरी, सुमित पाचपांडे, अमोल कोटेचा, रितेश बेंडाळे, मोहित बोंडे आदींनी परिश्रम घेतले.



