जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हा दौर्यावर आगमन झाले असून शुक्रवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सकाळी सव्वाआठच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, आ. अनिल भाईदास पाटील, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया,महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.



