भुसावळ – तालुक्यातील दिपनगर येथे दोघा मद्यधुंद व्यावसायीकात झालेल्या शाब्दिक वादात चाकू हल्ला झाल्याने तरुण गंभीर जखमी झांल्याची घटना आज संध्याकाळी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये डंपर व्यवसायिक आपला व्यवसाय करून सायंकाळी सरगम गेट जवळ सिगारेट पीत होंते सरगम गेटजवळ सायंकाळी दोन मद्यधुंद व्यवसायिकांमध्ये चर्चा सुरु होती दरम्यान अचानक काही शाब्दिक वाद झाले व वाद विकोपाला गेल्याने एकावर
अज्ञाताने चाकू हल्ला करून जखमी केल्याची घडली
यात प्रहार पक्षाचे तालुका पदाधिकारी उज्वल पटेल तरुणावर चाकू हल्ला करीत जखमी केल्याने सरगम गेट समोरील परिसरात धावपळ झाली.जखमी तरुणाला आधी भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.जखमी तरुण एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.


