भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन :

भूसावळ – आर्या फौंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 65 महापरिनिर्वाण दिनी
संपूर्ण आर्या फौंडेशनच्या टीम कडून आर्या फौंडेशनचे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानाची मानवंदना अर्पण करण्यात आली,
प्रसंगी अरुण तायडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट उलगडत, “
शिक्षण है वाघिणी चे दूध आहे,आणि जो है प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहनार नाही
असे प्रतिपातदन केले .
त्याच प्रमाणे सौ.लताताई तायडे यांनी
डॉ. बाबासाहेबनी लिहिलेले हिन्दू कोड बिल मधील महिलाच्या कायद्या विषयी उपायुक्त माहिती दिली.
अध्ययन पॅरामेडीकल कॉलेज च्या प्राचार्या सौ मनीषा बाविस्कर यांनी या अभिवादनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,
तसेच
शिका.. संघटीत व्हा ,संघर्ष करा ,
व “शासनकर्ती जमात व्हा”…
या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ विद्यार्थ्यांना आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे यांनी समजवून सांगितला.
तसेच बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत बाबासाहेबांना आपेक्षित व्यसनमुक्त समाज घडवा यासाठी दर सोमवारी नवजीवन व्यसनमुक्ति केंद्रात व्यसनमुक्ति साठी मोफत तपासणी व मोफत मार्गदर्शन केले जाईल, तसेच अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये मंगळवारी व बुधवारी मोफत डेंगू मलेरिया व टायफाइड तसेच इतर आजार व महिलाचे आजार यांची मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाईल
या मोफत उपक्रमची घोषणा केली,
या प्रसंगी आर्या फौंडेशनच्या टीमने व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल.