रविवारी भुसावळ व रावेरला टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची २१ वी १९ वर्षातील ( जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा रत्नागिरी येथे १६ ते १८ डिसेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवारी ५ रोजी सकाळी ११ वाजता नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर भुसावळला व दुपारी २ वाजता सरदार जी. जी हायस्कूलच्या मैदानावर सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लब तर्फे रावेरला होणार आहे.
१ जानेवारी २००३ नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, युवराज माळी, जे के पाटील, प्रतीक कुलकर्णी अजय महाजन, प्रतीक खाराले, विकास पाटील, तारेख अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.