भुसावळ : भुसावळातील रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य तथा महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांचा बुधवार, 1 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने शहरातील सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून त्यांना समाजसेवेसाठी दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर वॉर्डातील प्रभाग दहामध्ये ई श्रम कार्ड, डिजिटल कार्ड व ज्येष्ठ कार्ड नोंदणी अभियान राबवण्यात आले. पहिल्याच दिवशी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व 323 नागरीकांनी नोंदणी केली.

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत पाटील यांनी प्रभाग क्रमांक दहामधील विठ्ठल मंदिरात असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ई- श्रम कार्ड, डिजिटल आरोग्य कार्ड तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरीकांसाठी अत्याधुनिक स्मार्ट कार्ड नोंदणी अभियान राबवले. या शिबिराला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व तब्बल 323 नागरीकांनी नोंदणी केली.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासकीय अनुदान मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यांच्या व त्यांच्या परीवाराला मोफत अपघाती विमा मिळावा तसेच नागरीकांना आरोग्य विषयक अनुदान त्वरीत मिळावे आणि ज्येष्ठ नागरीकांना परीवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध होण्यासाठी अभियान राबविण्यात येत असून गुरूवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून नोंदणी करण्यात आल्याचेआयोजक अनिकेत पाटील यांनी सांगितले. अभियानात भुसावळ शहराचे नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक डॉ.सुनील नेवे, देवेंद्र वाणी, सुधीर पाटील, सुहास फालक, पुरषोत्तम नारखेडे, अॅड.बोधराज चौधरी, दिनेश नेमाडे, सुमित बर्हाटे व मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.


