स्टेट बँक घोटाळा प्रकरण ; मुख्य आरोपी बँक मँनेजर रविंद्र पाटील यास ५ दिवसाची पोलिस कोठडी –

भुसावळ – शहरातील स्टेट बँक आंनद नगर शाखेत काही इसमांनी बनावट सौदे पावती खरेदीखत बनवून त्या ठिकाणी कुठेही इमला नसून गृह कर्ज मंजूर करून बँकेची फसवणूक केली होती.याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील मुख्य आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेऊन नागपूर वरून ताब्यात घेऊन अटक केली होती.आजरोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांचा पोलीस कोठडी सूनविली आहे.

स्टेट बँक बनावट सौदे पावती प्रकरणातील मुख्य आरोपी व भुसावळ स्टेट बँक मॅनेजर आनंद नगर शाखेचे रविंद्र बाबूलाल पाटील वय ४९ राहणार प्लॉट नंबर ३०३ वौशाली नगर नागपूर येथून ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करून दिनांक २५/११/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती.आजरोजी मा.प्रथम वर्ग न्यायालय भुसावळ येथे हजर केले असता आरोपीस मा न्यायाधीशांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सूनविली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश धुमाळ व पोकॉ सुभाष साबळे करीत आहे.

गुन्ह्याची कसून चौकशी सुरू असून यामध्ये काही राजकीय गावगुंडयांचा समावेश असून आरोपी वाढण्याची शक्यता आहे.