सुसंस्कारीत पिढी घडवून मुलांना खंबीर बनवा – फौजदारी व दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. एम शिंदे ;

भुसावळ:- तालुका विधी समिती व तालुका वकील संघ भुसावळ यांच्या संयुक्त विधमाने “विधी सेवा शिबीर” नुकतेच जय गणेश जेष्ठ नागरिक संघ कार्यक्रमात गणपती मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे पार पडेल. या कार्यक्रमात फौजदारी व दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. एम शिंदे यांनी बालकामगार कायदा, जेष्ठ नागरिक कायदा व मृत्यूपत्र या विषयी विस्तृत व महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.
वडीलधारी मंडळी घरात हवी, त्यांनी केलेल्या परिश्रमाची किंमत करा. देव ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून देवाने आईची निर्मिती केली. मुलांना चांगले संस्कार घडवून त्यांना खंबीर बनवा असा मोलाचा सल्ला दिला तसेच जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा उत्साह बघून त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आम्ही जेव्हा त्यांच्या सारखे जेष्ठ नागरिक होऊ तेव्हा आम्ही सुध्दा असेच कार्यक्रम राबवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिला बार असोसिएशन अध्यक्ष श्रीमती ॲड. जास्वंदी भंडारी यांनी कायदा सर्वांसाठी आहे का? या बाबत माहीती देत प्रस्ताविक केले. भुसावळ बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. तुषार पाटील यांनीही जय गणेश जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक करीत इतर कायदे विषयी उपयुक्त माहिती दिली.
सुरुवातीला फौजदारी व दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. एम शिंदे यांच्या हस्ते श्री गणपती पूजन व कै. अरुण मांडाळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यांच्या शकुंतला बालजीवाले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ॲड.निलेश भंडारी, ॲड. विक्रम शेळकेे, ॲड.कैझर भारमल विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व पत्रकार उज्वला बागुल उपस्थित होत्या. त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष वसंत चौधरी होते. व्यासपीठावर फौजदारी व दिवाणी न्यायाधीश ॲड श्रीमती डी. एम. शिंदे, ॲड श्रीमती जास्वंदी भंडारी,ॲड तुषार पाटील, महादेव बोबडे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव अशोक चौधरी यांनी तर आभार दिनकर जावळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय गणेश जेष्ठ नागरिक संघ कार्यकर्ते सौ. ढाके, श्रीमती सुलोचना वारके, एल. पी. चौधरी, विलास बेंद्रे, सुरेश पाटील, भानुदास बऱ्हाटे, धोंडू पाणकर, प्रमोद काकडे, भास्कर पाटील यांनी परिश्रम घेतले.