भुसावळ : कोळी समाज विकास मंडळ भुसावळतर्फे राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परीचय मेळाव्याचे रविवार, 14 रोजी सकाळी 11 वाजता गजानन महाराज नगरातील कोळी समाज मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला कोळी समाजभूषण व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे, अशोक कांडेलकर, प्रभाकर सोनवणे, प्रभाकर सोनवणे (वढोदा) व समाजातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास इच्छूक वधू-वरांनी तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे व राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष शांताराम दगडू कोळी व अभिमन्यू सोनवणे, दीपक सोनवणे यांनी केले आहे.



