करकंब(ता.पंढरपूर)येथे महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाज संघ/संघटना पदाधिकारी मेळावा संपन्न

कैकाडी समाजाचा अनुसूचित जाती मध्ये समावेश करण्यासाठी अधिवेशनात ठराव मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कैकाडी संघ/ संघटना यांच्या वतीने आमदार यशवंत(तात्या)माने व महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समिती चे अध्यक्ष श्री हनुमंत माने गुरूजी,श्री लालासाहेब जाधव तसेच माजी पोलीस अधिकारी डीवायएसपी श्री रघुनाथ जाधव यांचा सत्कार संघटनेचे व संघाच्या वतीने करण्यात आला.
त्याचप्रमाणें विदर्भ मध्ये कैकाडी समाज अनुसूचित जाती मध्ये येतो, आणि इतर जिल्ह्यात विमुक्त जाती मध्ये येतो,यामुळे या समाजावरील क्षेत्रीय बंधनं उठवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरावं मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, आपण सर्वांनी मिळून केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत असें आमदार यशवंतराव माने यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जयशंकर माने, सतीश माने, राहुल जाधव,बंडोपंत जाधव,तानाजी जाधव, श्रीकांत माने, सोमनाथ जाधव,दीपक शामदिरे , देवा गायकवाड, रवी गायकवाड जळगाव,शिवाजी माने सर उस्मानाबाद, रघुनाथ जाधव ग्रंथापाल,स्वरूपंचांद गायकवाड,ह भ प सत्यवान महाराज,पाथर्डी चे महाराज, विनोद गायकवाड, सुभाष जाधव,विजयकुमार माने सर, व कैकाडी समाज संघ,/संघटना व युवक संघ संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येनेउपस्थित होते.