भुसावळ : शहरातील बबलू खान यांची प्रहार जनशक्ती पार्टीच्या सोशल मिडीया सेल जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी मुंबई येथे प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्याहस्ते व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनुसार पुढील काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबूतीने उभी करा कराल, असा विश्वास खानदेश प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



