:
भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथील नागसेन कॉलनी,प्लॉट नंबर २४ मध्ये दिनांक १० रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे ग्रील वाकवून आत प्रवेश करून रोख रक्कम लांबविल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सेवानिवृत्त लोको पायलट सुभाष पांडुरंग खैरे वय ५८ राहणार नागसेन कॉलनी,प्लॉट नंबर २४ मधील रहिवाशी हे पिपरिया जिल्ह्या छिंदवाडा येथे गेले असता त्यांचे राहत्या घरात दिनांक १०/१०/२०२१ रोजी रात्री १२:३० ते रात्री २ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे कंडारी येथील घराच्या मागील दरवाज्याचे वरील ग्रील वाकवून कुलूप तोडून त्यातून
घरात प्रवेश करून मधल्या खोलीतील गोजरेज कपाटातील २ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने तसेच हॉल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर मशीन असे फिर्यादीच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून शहर पोलीस स्टेशनला भाग -५ गुरन १५४/२०२१ भा.द.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विनोदकुमार गोसावी करीत आहे.सदर घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे,ए.पी,आय.संदीप दुणगहू,सपोनि विनोद कुमार गोसवी अशांनी भेट दिली


