मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक बंद पडल्याने वापरकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर कोट्यवधी लोक करतात दर तासाला अब्जावधी मेसेजची देवाणघेवाण होते. मात्र व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्यानं वापरकर्ते हैराण झाले आहेत. व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचे सर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरात कोट्यवधी लोकांना समस्यांचा सामना तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ करावा लागला.

दरम्यान, सोमवारी रात्री ठप्प झालेली सेवा मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सुरळीत करण्यात यश आले मात्र हा तांत्रिक बिघाड नेमका का व कसा झाला हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.


