मुंबई – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी दि. ४.१०.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना (भुसावळ विभागातून तीन, नागपूर विभागातून तीन तसेच मुंबई, पुणे आणि सोलापूर विभागातून प्रत्येकी एक) “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला. या पुरस्कारात पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि २,०००/- रुपये रोख आहे. सप्टेंबर २०२१ महिन्यात कर्तव्यावर असताना संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या संरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या सतर्कतेसाठी आणि त्वरित केलेल्या कारवाईसाठी निवड करण्यात आली.

श्री तानाजी आर पाटील, गार्ड (गुड्स), पुणे यांनी १६व्या वॅगनमध्ये स्पार्किंग झाल्याबद्दल ड्रायव्हरला सतर्क केले आणि ब्रेक बाइंडिंग असल्याचे आढळल्याने संभाव्य अपघात टाळता आला.
श्री कुमार दुर्गेश, लोको पायलट (गुड्स), सोलापूर मालगाडीवर काम करत असताना एक धक्का जाणवला आणि त्यांनी त्वरीत संबंधितांना कळवले, तो तुटलेला फ्लॅश वेल्ड असल्याचे आढळले.
श्री मोहनीश रंगारी, की मॅन, अजनी नागपूर यांना सिग्नलची देवाणघेवाण करताना एका वॅगनमध्ये हॉट एक्सल दिसले आणि त्यांनी तत्परतेने लाल सिग्नल दाखवून ट्रेन थांबवली.
श्री व्ही ए करपटे, उपस्थानक व्यवस्थापक, खापरी यांनी सिग्नलची देवाणघेवाण करताना ८व्या वॅगनमध्ये एक गरम एक्सल दिसले आणि त्यानी लगेचच ट्रेन थांबवली आणि वॅगन बाजूला काढून टाकण्यात आली.
श्री प्रशांत कुंभारे, उपस्थानक व्यवस्थापक, भुसावळ केबिनमध्ये काम करत असताना मालगाडीमध्ये वेगळाच आवाज जाणवला आणि त्यांनी संबंधितांना कळवले. तपासणी केली असता तेथे रूळ फ्रॅक्चर आढळले.
श्री योगेश सरवण, ट्रॅक मेंटेनर IV, देवळाली, भुसावळ आणि श्री मंजूर आलम, ट्रॅक मेंटेनर IV, देवळाली, भुसावळ यांना रात्रीच्या गस्तीदरम्यान लक्षात आले की, आरओबीची भिंत तोडणारा एक ट्रक रेल्वे ट्रॅकवर लटकलेला आहे. त्यांनी तात्काळ सर्व संबंधितांना याची माहिती दिली आणि अनुचित घटना टाळण्यासाठी येणारी ट्रेन थांबवली.
श्री संजय शंकर चव्हाण, लोको पायलट, कुर्ला मुंबई हे 02978 डाउन या ट्रेनवर काम करत असताना कासु – नागोठणे विभागात रेल्वे फ्रॅक्चर दिसले आणि आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि संभाव्य अनुचित घटना टाळली.
श्री अमित परदेशी, कनिष्ठ अभियंता (कॅरेज आणि वॅगन) यांनी नागपूर विभागातील बल्हारशाह यार्डमध्ये झुकलेल्या अवस्थेतील एका डब्याचे लोअर स्प्रिंग लक्षात आणून दिले.
श्री अनिल कुमार लाहोटी, या प्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये २४×७ असलेली सतर्कता इतरांना प्रेरित करेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे कार्य करेल.
श्री बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि श्री आलोक सिंह, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, श्री ए. के. गुप्ता, प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनीअर, श्री अश्वनी सक्सेना, प्रिन्सिपल चीफ इंजिनीअर, श्री गोपाल चंद्रा, प्रिन्सिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख इतर प्रमुख उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात सामील झाले. बैठकीदरम्यान सर्व कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.


