जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडून मलखांब स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट चेतन भूषण मानकरे याचा सत्कार

वरणगाव – येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये नाभिक समाजाचे पदाधिकारी श्री संतोष रेलकर यांचे निवासस्थानी मल्लखांब स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चेतन भूषण मानकरे याचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधान महाजन यांचे सह नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे करण्यात आला वरणगाव शहराच्या इतिहासात सन्मानाचा तुरा रोवणाऱ्या चेतन यास विविध स्तरातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याचाच एक भाग म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसंगी चेतन यास उपस्थित सर्वांच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी त्याची पुढील वर्षीच्या ऑलम्पिक स्पर्धेत साठी निवड व्हावी त्यासाठी त्याने आपल्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करावे असे सूचित करुन शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वांनी त्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले

प्रसंगी नाभिक समाजाचे स्थानिक अध्यक्ष कमलेश येवले उपाध्यक्ष तुकाराम सणांचे सचिव संतोष रेडकर युवा सेना उपाध्यक्ष गोटू भाऊ सणांचे कार्याध्यक्ष आकाश निमकर जिल्हा महिला जीवा सेना अध्यक्ष कोकिळाताई चित्ते सौ कल्पना रेलकर प्रवीण पाटील रवी पवार राहुल बावणे बाळा धनगर राजेश महाजन दिशा समाधान महाजन श्रुती रेलकर अमेय रेलकर यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते